*एक चळवळ वृक्ष लागवडीची आणि त्यासोबत एक तळमळ वृक्ष संवर्धनाची
एक चळवळ वृक्ष लागवडीची
एक चळवळ वृक्ष लागवडीची आणि त्यासोबत एक तळमळ वृक्ष संवर्धनाची:
आमचे मित्र श्री भानुदास पाटील यांनी मागील वर्षी वृक्ष लागवडीसाठी भरपूर मेहनत घेत त्यांच्या प्रणिता प्रतिष्ठानच्या माध्यमातून एक मोठी वृक्ष लागवड चळवळ उभी केली आहे, त्यामाध्यमातून त्यांनी ग्रामीण रुग्णालय, भुसावळ व कॉलनी परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड केली आहे. निसर्गाचा समतोल राखण्याच्या दृष्टीने व निसर्गाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेने आपण सर्वांनी वृक्ष लागवड केली पाहिजे, परंतु त्यासोबतच आपल्या परिसरात पडत असलेल्या अतितीव्र उन्हाळ्यामुळे वृक्ष संवर्धन सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहे. त्या माध्यमातूनच श्री भानुदास पाटील यांनी एक उपक्रम राबवत अतिशय घरगुती व विनामूल्य मार्ग अवलंबत वृक्ष संवर्धनासाठी प्रयत्न चालू केला आहे. त्यासाठी त्यांनी आपल्या पिण्याच्या पाण्याच्या वापरलेल्या बाटल्या व सुतळी यांचा वापर करीत झाडांसाठी संजीवनी ठरेल असा ठिबक सिंचनाचा प्रयोग केला आहे. त्या मार्फत त्यांचा झाडे जगवण्यासाठी आटापिटा चालू आहे . माझे या चॅनल मार्फत सर्व नागरिकांना आवाहन आहे की त्यांनी सुद्धा आपापल्या घराजवळील झाडांना असा विनामूल्य प्रयोग करीत या उन्हाळ्यात झाडे वाचवली पाहिजेत. झाडे जगली तरच पक्षी जगतील, सृष्टी जगेल, मानवही जगेल…..
चला तर मग आपण सर्वजण मिळून या वृक्ष संवर्धनाचा विडा उचलूया….